Close

मिश्र फळांचं श्रीखंड आणि बासुंदी (Mix Fruit Srikhand And Basundi)

मिश्र फळांचं श्रीखंड


साहित्य : अर्धा किलो तयार साधं श्रीखंड (केशर वेलची श्रीखंडही घेता येईल), 1 वाटी दूध, 2-अडीच वाटी मिश्र फळांचे बारीक तुकडे (सफरचंद, केळं, आंबा, चिकू, द्राक्षं, अननस, डाळिंब इत्यादी), थोडी चारोळी.
कृती : एका भांड्यात दूध आणि श्रीखंड एकत्र करा. हे मिश्रण डावाने चांगलं घोटून घ्या. नंतर त्यात फळाचे बारीक तुकडे आणि चारोळ्या घालून एकत्र करा. तयार मिश्र फळांचं हे श्रीखंड काही वेळासाठी फ्रिजमध्ये ठेवा. नंतर थंडगार सर्व्ह करा.

बासुंदी


साहित्य : 3 लीटर दूध, 20 ग्रॅम वेलदोडे (पूड केलेले), 1 किलो साखर, 100 ग्रॅम बदाम (पातळ काप केलेले), 50 ग्रॅम मनुका,
50 ग्रॅम चारोळी.
कृती : दूध आटवून त्यात साखर एकत्र करा. साखर विरघळल्यावर त्यात बदामाचे काप, वेलदोड्यांची पूड, चारोळी आणि मनुका एकत्र करा. ही बासुंदी गरमागरमही छान लागते. थंडगार हवी असल्यास, साधारण थंड झाल्यावर काही तासांकरिता फ्रीजमध्ये ठेवा. वाढताना वरून काही बदामाचे काप घाला.

Share this article