Close

पोटॅटो लटके (Potato latkes)

पोटॅटो लटके
साहित्य : 2 बटाटे, अर्धा कप कांदा बारीक चिरलेला, 1 अंडं फेटलेलं, स्वादानुसार मीठ, पाऊण कप ऑलिव्ह ऑईल.
कृती : बटाट्याची सालं तासून, किसून घ्या. बटाट्याचा कीस थंड पाण्यात पाच मिनिटं बुडवून ठेवा. नंतर त्यातील पाणी पूर्णतः निथळून घ्या. हा कीस आणि कांदा सुती कापडावर ठेवा. कापड गुंडाळून पिळा म्हणजे, बटाटा आणि कांद्यातील अतिरिक्त पाणी निघून जाईल. आता एका वाडग्यामध्ये फेटलेलं अंडं, किसलेला बटाटा, कांदा आणि मीठ घेऊन मिश्रण चांगलं फेटून घ्या. नॉनस्टिक पॅनमध्ये ऑलिव्ह ऑईल लावून त्यावर 1 टेबलस्पून अंडं-बटाट्याचं मिश्रण पसरवून घाला. मंद आचेवर सोनेरी रंगाचं होईपर्यंत भाजा. पाच मिनिटांनंतर परतून दुसरी बाजूही सोनेरी रंगाची होईपर्यंत भाजून घ्या. नंतर ते टिश्यू पेपरवर काढून घ्या. गरमागरम सर्व्ह करा.
टीप : बेक्ड पोटॅटो लटके बनवण्यासाठी, ते प्रीहिटेड ओव्हनमध्ये 200 डिग्री सेल्सियसवर अर्धा तास बेक करा.

Share this article